काश्मीर कलम ३७०/ लोकसभा Live: कलम ३७०वरून जोरदार चर्चा

काश्मीर कलम ३७०/ लोकसभा Live: कलम ३७०वरून जोरदार चर्चा Article 370 Jammu and Kashmir amit shah loksabha parliment congress bjp

थोडं पण कामाचं

  • 👉लोकसभेत कलम ३७०वरून वाद
  • 👉गृहमंत्री अमित शहांनी सोमवारी सादर केला होता प्रस्ताव
  • 👉कलम ३७० हटवण्याबाबत राज्यसभेत शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: सोमवारी राज्यसभेत जेव्हा गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवण्याबाबत संकल्प सादर केला जेव्हा 👉काश्मीर संबंधात भारत सरकारने अनेक पावले उचलली होती. संकल्प प्रस्तावाला काँग्रेसने विरोध केला. 

👉मात्र १२५ आणि ६१ या मोठ्या फरकामुळे काँग्रेसचा विरोध दबला गेला आणि जम्मू-काश्मीर एका नव्या भविष्याच्या दिशेने पुढे गेला. 

या संबधात लोकसभेत सोमवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी संकल्प प्रस्ताव सदनासमोर ठेवला. यावर लोकसभेत आज चर्चा होत आहे. 

राज्यसभेत विरोधकांना उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले 

👉कलम ३७०मुळे काश्मीरच्या लोकांचा विकास झाला तर केवळ तीन राजकीय कुटुंबांना फायदा झाला. जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवणयाबाबत अमित शहांनी उत्तर दिले. 

Loksabha Live Updates:

  1. 👉जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक लोकसभेत मंजूर.
  2. 👉 ३६७ विरूद्ध ६७मताधिक्यानं आरक्षण विधेयक पारित
  3. 👉कलम ३७०मुक्त काश्मीरचं भाजपाचं स्वप्न साकार
  4. 👉काश्मीरच्या विभाजनाचं विधेयक संमत
  5. 👉विधेयकाला ४२४ पैकी बाजूनं ३५१, विरोधात ७१, तटस्थ १ मतं
  6. 👉राज्यसभेनंतर लोकसभेतही ऐतिहासिक विधेयक मंजूर
  7. 👉आवाजी मतदानानं विधेयक मंजूर, विरोधकांना प्रत्यक्ष मतदान हवं
  8. 👉कलम ३७० साठी लोकसभेत मतदानास सुरूवात
  9. 👉अटलजींनी नेहमीच कलम ३७० ला विरोध केला- अमित शहा
  10. 👉कलम ३७० मुळे युवा पिढीचं भलं कधी होणार नाही- अमित शहा
  11. ♨️सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला गृहमंत्र्यांचं चोख उत्तर
  12. 👉पृथ्वीचा स्वर्ग काश्मीर होते, आहे आणि राहिल, त्यामुळे त्याच्या सुंदरतेला आम्ही धक्का लागू देणार नाही - अमित शहा
  13. 👉पृथ्वीवरचा स्वर्ग ही काश्मीरची ओळख कायम ठेवू- शहा
  14. 👉काश्मीरच्या पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊ- अमित शहा
  15. ♨️देशभरातील जमिनींच्या किंमती वाढल्या, पण जम्मू काश्मिरातील जमिनांच्या किंमती कधीच वाढल्या नाही, त्या फक्त ३७० कलमामुळेच - अमित शहा
  16. ♨️दहशतवाद हे गरिबीमुळे वाढले आहे. 
  17. असे सुप्रीया सुळे म्हणतात, पण देशातील गरीब कधीच हत्यार उचलत नाही - अमित शहा
  18. 👉जम्मू काश्मीरातील मुलगी भारतीयाशी लग्न केले तर तिच्या मुलांना जम्मू कश्मीरात घर खरेदी करता येत नाही, आता तो अधिकार नरेंद्र मोदी सरकार त्यांना देणार आहे - अमित शहा
  19. 👉२००४ ते २०१९ मध्ये २ लाख ७७ हजार कोटी रुपये भारताने जम्मू काश्मीरला दिले आहे, ते पैसे कुठे गेले - अमित शहा
  20. 👉इथले आदिवासी, दलित आरक्षणापासून वंचित का? - अमित शहा
  21. 👉३७० कलम हद्दपार करण्याचा आमचा ठाम निर्धार- अमित शहा
  22. 👉वनरक्षकांच्या संरक्षणासाठी कायदाही स्वीकारला नाही, याखेरीज अनेक केंद्रीय कायदे आहे, त्यामुळे जम्मू काश्मीरचा विकास रोखला आहे.
  23. 👉कलम ३७० मुळे केवळ तीन कुटुंबांचं भलं झालं- अमित शहा
  24. 👉सफाई कर्मचाऱ्यांसाठी कमिशन पण स्वीकारले नाही - अमित शहा
  25. 👉कलम ३७० मुळे आम्ही काश्मीर खोऱ्याचे किती नुकसान केले हे याचा काँग्रेस कधी विचार करेल का ?
  26. 👉असे निर्णय पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी नसतात- अमित शहा
  27. 👉तीन कुटुंबांमुळे काश्मीरचं अतोनात नुकसान- अमित शहा
  28. 👉दिव्यांगासाठीचा कायदा लागू नाही झाला, पण काश्मीरात नाही लागू
  29. 👉नॅशनल कौउंसिल टीचर एज्युकेशन हा कायदाही ३७० मुळे लागू झाला नाही - अमित शहा
  30. 👉राईट टू एज्यूकेशन, ६ ते १४ वर्षातील मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे, तो ३७० कलमामुळे काश्मीरात लागू होत नाही- अमित शहा
  31. 👉नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी हा कायदा पण पोहचला नाही - अमित शहा
  32. 👉काश्मीरात बालविवाहचा कायदा लागू होऊ शकत नाही, तो फक्त ३७० कलमामुळे - अमित शहा
  33. 👉१०९ कायदे आम्ही ३७० कलमामुळे जम्मू काश्मीरमध्ये लागू करू शकत नाही
  34. 👉कलम ३७० हे महिला विरोधी, दलित विरोधी, अल्पसंख्याक विरोधी आहे - अमित शहा
  35. 👉हा निर्णय ऐतिहासिक चूक सुधारण्यासाठी- अमित शहा
  36. 👉४१ हजारांहून अधिक बळींना जबाबदार कोण?- अमित शहा
  37. 👉काश्मीरमध्ये फक्त मुस्लिमच राहतात असं नाही- अमित शहा
  38. 👉लडाखचं विभाजन ही स्थानिकांचीच मागणी- अमित शहा
  39. 👉कलम ३७० हे काश्मीरसाठी कसे फायदेशीर आहेत, हे कोणत्याच खासदाराने सांगितले नाही - अमित शहा
  40. 👉मी लोहपुरूष नाही बनू इच्छित नाही, मी भाजपचा एक छोटा कार्यकर्ता आहे, मला वैयक्तीक प्रतिमा उचळण्याची गरज नाही. मी आहे त्या ठिकाणी योग्य आहोत. - अमित शहा
  41. 👉असे निर्णय देशाच्या हितासाठी केले जातात- अमित शहा
  42. लडाखच्या खासदाराचे अमित शहा यांच्याकडून कौतुक
  43. 👉३७० नं काश्मीरचं मोठं नुकसान केलं- अमित शहा
  44. ४१ हजारांहून अधिकाचा बळी गेल्याची जाण ठेवा- अमित शहा
  45. १९८९ पासून आजपर्यंत ४१८०० लोक मारले गेले, ते याच रस्त्यावर चालून गेलो होतो. त्यामुळे आता वेगळ्या मार्गाने जावे लागणार आहे - अमित शहा
  46. स्थिती बिघडली म्हणून आम्ही कर्फ्यू लागू केला नाही, तर स्थिती न बिघडावी यासाठी कर्फ्यू लागू केला आहे - अमित शहा
  47. ३७० चा वापर करत पाकिस्ताननं काश्मीर धुमसत ठेवलं- अमित शहा
  48. जम्मू काश्मीरमध्ये आमदार असतील, खासदार असतील - अमित शहा
  49. ३७० कलम तात्पुरते होते. पण ते हटविण्यासाठी ७० वर्ष लागले,  आम्हीही जम्मू काश्मीरला तात्पुरते केंद्र शासित केले आहे. त्याचे पुन्हा राज्य करू त्यासाठी ७० वर्ष लागणार नाही - अमित शहा
  50. देशविरोधी शक्तींना हाणून पाडण्याचा निर्धार- शहा
  51. लडाख केंद्र शासित प्रदेश राहणार ही तेथील लोकांची मागणी होती, पण काश्मीर थोड्या काळासाठी केंद्र शासित राहणार, योग्य वेळ आल्यावर त्याला पुन्हा राज्याचा दर्जा देण्यात येणार
  52. आंध्रप्रदेशचे तुकडे करताना तुम्ही चर्चा केली होती का, तुम्ही आता आम्हांला शिकवत आहे का? - अमित शहा
  53. बेरोजगारीमुळे दहशतवाद वाढतो, असे नाही कारण बेरोजगारीचा प्रश्न सर्व राज्यात आहे. त्या ठिकाणी का दहशतवाद वाढत नाही, पण काश्मीरमध्ये ३७० कलम असल्याने दहशतवाद वाढतो, आणि त्यात पेट्रोल टाकण्याचे काम पाकिस्तान करतोय - अमित शहा
  54. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही इंटरनेट आणि दूरसंचार बंद केले होते - अमित शहा
  55. जम्मू काश्मीरबद्दलचे निर्णयाचे सर्वाधिकार संसदेलाच- अमित शहा
  56. ३७१ रद्द करण्याचा कोणताही विचार नाही- अमित शहा
  57. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद- शहा
  58. काश्मिरच्या जनतेला आम्ही आणि संपूर्ण भारत गळाभेट घेणार, त्यांच्या चर्चेची वेळ असेल तर ती करणार - अमित शहा
  59. सुप्रिया सुळे म्हणतात की चर्चा होत नाही. पण ७० वर्षांपासून चर्चाच करत आहे. जे पाकिस्तानशी चर्चा करतात त्यांची आम्ही चर्चा करणार नाही - अमित शहा
  60. खबरदारीचा उपाय करणे गैर आहे का? - अमित शहा
  61. समाजविघतक शक्तींना कधीही सफल होऊ देणार नाही- शहा
  62. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हाणून पाडू- शहा
  63. या निर्णयामुळे मोदींचं योगदान कायम स्मरणात राहिल- शहा
  64. कलम ३७१ मुळे महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि ईशान्य राज्यावर परिणाम होईल. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकार कलम ३७१ हटविणार नाही - अमित शहा
  65. ३७० आणि ३७१ कलम यातील फरक आहे - अमित शहा
  66. काश्मीरी जनतेच्या मनात फुटरतावादाला पेट्रोल टाकून भडकवण्याचे काम पाकिस्तान करत आहे, हे फक्त कलम ३७० मुळे - अमित शहा
  67. या घटनेची आठवण होईल तेव्हा नरेंद्र मोदींची आठवण नेहमी केली जाईल - अमित शहा
  68. काश्मीर हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात कोण घेऊ गेले, ते नेहरूच घेऊन गेले - अमित शहा
  69. लष्कराला परवानगी दिली असती तर संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर आज भारतात असते- अमित शहा
  70. जवाहरलाल नेहरूंमुळे पाकव्याप्त काश्मीर झाले आहे- अमित शहा
  71. भारतीय सीमांतर्गत निर्णय घेण्यास भारतीय संसदेतला अधिकार आहे. यात संयुक्त राष्ट्राच्या नियमांचा उल्लंघन नाही
  72. लोकसभेत अमित शहांचं विरोधकांना उत्तर
  73. कलम ३७० मुळे काश्मीर भारतापासून दूर- शहा
  74. कलम ३७० वर लोकसभेत चर्चा
  75. कलम ३७० वरील चर्चेला अमित शहा यांचं उत्तर
  76. लोकसभेत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा लाईव्ह

कलम ३७०वरून सुरू असलेल्या वादात शिरताना संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसला घेरले. ते म्हणाले जेव्हा देशात जल्लोष सुरू आहे तेव्हा काँग्रेसचे नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. पाकिस्तान सरकारकडून विधान आले आहे की काळा दिवस आहे. काँग्रेसचे नेतेही काळा दिवस सांगत आहेत. याचा अर्थ काय आहे. पाकिस्तानी नेता म्हणत आहेत की काळा दिवस आहे आणि तुम्ही त्यांची भाषा बोलत आहात.

Advertising
Advertising

डीएमके दयानिधी मारन म्हणालेस फारुक अब्दुल्ला संसदेत उपस्थित नाही आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबाबत कोणालाच काही माहीत नाही. तुम्हाला सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही निष्पक्ष असले पाहिजे. 

Loading ...

काँग्रेसकडून मनीष तिवारी यांनी जम्मू-काश्मीरच्या इतिहासाबाबत सांगताना म्हटले, कशा प्रकारे आधुनिक जम्मू-काश्मीरची निर्मिती झाली. काँग्रेस नेता मनीष तिवारी म्हणाले, गृहमंत्री तुम्ही कलम ३७० हटवू शकत नाही. आज संसदेत जे काही चालले आहे ते संविधानात्मक त्रासदायक आहे.याप्रकारच्या आरोपांना उत्तरे देत गृहमंत्री अमित शहा म्हणाले, काश्मीरचा मुद्दा यूएनमध्ये नेहरू घेऊन गेले होते.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले जम्मू-काश्मीरबाबत बोलायचे झाल्यास त्यात पाक अधिकृत काश्मीर आणि चीनच्या बाबतीतही चर्चा होते. यात कोणत्याही प्रकारचा संदेह नको. 

Loading ...

काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरींनी यावर उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. भारतीय संविधानाअंतर्गत या राज्यासंबंधित कायदे बनवण्यासाठी सरकार स्वतंत्र आहे. सरकारच्या या भूमिकेत कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. विरोधकांना वाटते का पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग नाही. खरं तर हे आहे की काश्मीरसाठी आपले प्राणही देतील. 

जम्मू-काश्मीर पुर्नवसन प्रस्ताव लोकसभेत गृहमंत्र्यांनी सादर केला. मात्र काँग्रेसने संकल्प प्रस्तावावर विरोधक केला. लोकसभेत काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी म्हणाले, काश्मीरचा मुद्दा केवळ भारताचा आंतरिक मुद्दा आहे. काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रकरण आहे. यातच भारत सरकारच्या या कारवाईने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होणार नाही. 

लोकसभेत कलम ३७०वर वादाआधी सत्ता पक्षाची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर मंत्री सामील आहेत. 

जम्मू-काश्मीरच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने स्थगन प्रस्ताव नोटीस दिली आहे. याआधी काँग्रेसच्या सदस्यांनी संसद भवनात सोनिया गांधी यांनी संबोधित केले होते आणि पुढील रणनीतीवर चर्चा केली होती. 

Comments