संविधान फाडणार्या पीडीपीच्या खासदारांवर होऊ शकते कारवाई
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जम्मू कश्मीरवरील कलम 370 हटवण्यावर विरोध करताना पीडीपीचे खासदर फैयाज लावे यांनी संविधान फाडले होते. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी कश्मीरवरील 370 कलम काढण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा विरोधी पक्षांनी एकच गोंधळ घातला. अनेक नेते हे राज्यसभेच्या वेल मध्ये येऊन घोषणा द्यायला लागले. सभापती त्यांना आपल्या जागेवर जाण्यास सांगत होते. तरी कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यानंतर पीडीपीचे खासदार मीर फैय्याज आणि नजीर अहमद यांनी विरोध म्हणून राज्यसभेत संविधानाची प्रत फाडली. त्यानंतर सभापती वैकंया नायडू यांनी दोन्ही खासदारांना सभागृहाबाहेर काढले.
दोन्ही खासदारांनी त्याचा निषेध नोंदवत आपले कपडे फाडले आणि कश्मीरी जनतेप्रति हा विश्वासघात असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान फाडल्याप्रकरणी दोघांवरही कायदेशीर कारवाई होईल असे म्हटले जाते.
Comments
Post a Comment