Skip to main content

मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पीडीपी खासदाराचा थयथयाट, राज्यसभेत फाडली संविधानाची प्रत


मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पीडीपी खासदाराचा थयथयाट, राज्यसभेत फाडली संविधानाची प्रत

पीडीपीच्या दोन खासदारांनीही राज्यसभेत स्वत:चे कपडे फाडले, यानंतर सभापती नायडू यांनी त्यांना सदनाबाहेर पाठवले.

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरबद्दल मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) ने संताप केला आहे. पीडीपीचा राज्यसभा खासदार मीर मोहम्मद फैयाजने सोमवारी संविधानाची प्रत फाडली. यानंतर राज्यसभेचे सभापती एम. वेंकैया नायडू यांनी मीर मोहम्मद फैयाजला सदनाबाहेर जाण्याचे निर्देश दिले.

पीडीपीचा खासदार मोहम्मद फैयाज मीर म्हणाला की, ही लोकशाही असो वा आणखी काही, आम्हाला (काश्मीरला) विशेषाधिकार हे भारताने दिले होते, पाकिस्तानने नाही. इंग्रजांनी आमच्यावर कोणतेही अत्याचार केले नव्हते. पण आता आम्ही गोळ्या खाण्यासाठी तयार आहोत, आम्हाला गोळी मारा.

तत्पूर्वी, गृहमंत्री अमित शाहांनी जेव्हा राज्यसभेत आपल्या भाषणाची सुरुवात केली तेव्हा विरोधी पक्षांनी गोंधळाला सुरुवात केली. जम्मू-काश्मिरात लागू असलेल्या कलम 370 मध्ये बदल आणि राज्य पुनर्रचनेच्या निर्णयाचा काँग्रेस, पीडीपीसहित अनेक पक्षांनी विरोध केला आहे.

मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) च्या दोन खासदारांनी राज्यसभेत स्वत:चे कपडे फाडले आहेत. खासदारांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत वैंकय्या नायडू यांनी या दोन्ही खासदारांना सदनाबाहेर पाठवले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत संविधानाचे कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यांनी प्रस्ताव सादर करताच सदनात विरोधकांनी मोठा गदारोळ केला.



Comments