१९ जानेवारी : काश्मिरी पंडितांची भळभळती जखम
१९ जानेवारी : काश्मिरी पंडितांची भळभळती जखम
1 / 9👉काश्मीरला कितीतरी विशेषण लावून गौरवलं जातं.
पृथ्वीवरचा स्वर्ग.
👉भारताच नंदनवन वगैरे. पण,
👉काश्मीरची दुसरी बाजू म्हणजे भळभळत्या जखमा.
👉अशीच एक जखम आहे, १९९०मधील. ही दुसरी फाळणीच होती.
👉काश्मीर आमचे म्हणजे मुस्लिमांचे आहे. असा फतवाच निघाला आणि काश्मीरातील पंडितांना वाडवडलांची भूमी सोडून शरणार्थींचं जीवन जगावं लागलं.
♨️त्याला आता जवळपास तीस वर्ष होत आहे.
2 / 9👉१९९० च्या जानेवारीत काय झाले? ‘
👉काश्मीर आमचे म्हणजे मुस्लिमांचे आहे. 👉‘आम्हाला आमचा पाकिस्तान पाहिजे
👉तुम्हा पुरुषांवाचून, तुम्ही इथून निघून जा, फक्त तुमच्या बायका इथे ठेवा.’ अशा अपमानजनक, मानहानीकारक घोषणांनी वातावरण दूषित झालं होतं.
3 / 9👉सर्वत्र फलक, घोषणा लिहिल्या गेल्या होत्या. अर्थात हे काही एका रात्रीत झालं नव्हतं.
👉त्या अगोदरपासूनच पंडितांना धमक्या येत होत्या.
👉त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
👉आपलं घरदार, वाडवडलांची भूमी, व्यवसाय, नोकऱ्या सोडून का नि कुठं जायचं? पण परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली.
4 / 9👉‘आमचा गुन्हा काय?’ या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे कुणाकडेच नाही.
👉 त्या रात्री काय झालं हे आठवलं तरी आजही त्यांच्या अंगावर काटा येतो.
👉जेव्हा आपल्यांनीही दगाफटका केला तेव्हा ज्या काश्मीरीयतबद्दल अभिमान होता, ती विखरून गेली. उद्ध्वस्त झाली.
5 / 9👉हे सारं का होत होतं? तर ते हिंदू होते म्हणून.
👉हे सत्य आपल्यासारख्या सर्वधर्मसमभाव बाळगणाऱ्यांनाही (सेक्युलरवाद्यांना) नाकारता येत नव्हतं.
👉ते नि:शस्त्र होते नि आजही तसेच आहेत.
- 6 / 9
👉ते जगत नव्हे तर सोसत होते.
👉आपलं अस्तित्व गमावत चालले होते.
👉आपली घरं, पिढीजात भूमी सोडून ते का जातील?
👉अपराध काय? पण कुणी दखल घेतली नाही, आजही घेतली जात नाही.
- 7 / 9
👉‘आमचे पिढय़ानुपिढय़ांचे शेजारी जन्माचे वैरी झाले.
👉आम्ही सोसत राहिलो,
👉परागंदा व्हायला लागू नये म्हणून!
👉पण पाहता पाहता काश्मीरचे खुले, मोकळे वातावरण विषाक्त झाले, अशी काहीशी अवस्था काश्मिरी पंडितांची झाली होती.
- 8 / 9
👉अंगावरील कपडय़ांनिशी कडाक्याच्या थंडीत लोक स्वत:चा, बायको, मुलांचा जीव वाचवत, आपल्या वाडवडलांच्या वास्तूकडे शेवटची नजर टाकत जम्मू आणि इतरत्र गेले.
👉ते आजही तेथेच राहत आहेत.
👉कुणाही राजकीय पक्षाला त्याबद्दल काही करायचे नाहीय का?
👉अनेक वष्रे ते तंबूत राहत होते. आता स्वकष्टाने त्यांची घरं उभी आहेत.
- 9 / 9
👉राहुल पंडिता, शशी शेखर, डॉ. शक्ती भान, तोषखानी, सुशील पंडित, नीस कौल आणि अनेक काश्मिरींनी आपल्या पायाखालची जमीन गेल्याचं दु:ख वर्णन केलं. याच घटनेवर आता शिकारा हा सिनेमा येऊ घातला आहे.
Comments
Post a Comment